माझा असा तर्क आहे की धडाभर लिहिलेले कुणीतरी वाचताना चुकून घडाभर वाचले कारण दोन अक्षरांच्या दिसण्यातील साम्य आणि धडा शब्द फारसा परिचित नसणे. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक पडला नाही, अतिशयोक्ती जास्तच अतिशयुक्त झाली आणि ते तसंच चालू राहिलं.
तुमच्या मताशी मी थोडा असहमत आहे कारण,
१. बोलीभाषेच्या अनुषंगाने लिखित भाषा निर्माण होत असते. अगोदर लिपी झाली आणि त्याप्रमाणे बोलीभाषा झाली हे पटत नाही.
२. भाषेची लिपी वाचुन कोणी बोलत नसते, महाराष्ट्राचा ग्रामीण भाग जर लक्षात घेतला तर हा मुद्दा जास्त स्पष्ट होतो.
३. अनेक शब्द हे उच्चारसाधर्म्य असलेले आहेत, जसे, ल आणि ळ, ण आणि न, ध, ड, घ याचा विचार केला तर भाषेमध्ये अनागोंदी माजेल.
मीराताई आणि इतर मनोगतींनी आपले मत कळवावे.
द्वारकानाथ