नाही. मुळात गिऱ्हाईकांनी मराठीत बोललेच नाही तर रिक्षावाल्यांना मराठी बोलायची संधी कशी मिळणार.
शक्यतो मराठी बोलण्याचे टाळतात. एक गंमत ऐका. काल प्रभात थिएटरला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेडिओ मिरचीने प्रभातचे कर्तेधर्ते श्री. लिमये (?) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी. रेडिओ छबकडी अदितीने विचारलेल्या मराठीतील प्रश्नांना श्री. लिमये 'इट्स माय प्लेजर. आय नो इट वाज टफ टाईम. थ्यांक्यू सो मच' वगैरे ६८ टक्के इंग्लिशमधून उत्तरे का देत होते हे समजले नाही.
कोणीही नाही. उगाच आश्वासनांची संख्या वाढवण्यासाठी हे टाकले असावे असे वाटते.
मते मिळवण्यासाठी अशी शाब्दिक कसरत करावी लागते. समजून घ्या.
कदाचित मराठी शब्द आठवला नसावा किंवा माहीत नसावा.
सेम ऍज अबोव!!


कर्नाटकातही भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातही त्यांचेच सरकार आले तर बेळगाव प्रश्नाबाबत भाजपचे काय धोरण असेल? की या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली आहे?