जीवनगंधाजी खूपच सुरेख लिहिलंत. यात मला तरी अतार्किक वगैरे काही वाटत नाही. दोघांनाही आधीचा अनुभव होता. त्यात राहिलेल्या त्रूटी या दुसऱ्या डावात भरून काढता येण्याची शक्यता होती. तेच त्यांनी केले. याचा अर्थ असा नाही की ते दोघेही आपापल्या पहिल्या जोडीदाराला विसरले आहेत. पण समजुतदारपणा असेल तर हे जमते. यापुढे जाऊन मी तर म्हणीन की जन्मभर एकमेकांशी न पटताही केवळ इलाज नाही म्हणून एकमेकांना सहन करत बसण्यापेक्षा वेगळे होऊन दुसरा डाव मांडून बघायला काय हरकत आहे? आपल्या समाजाच्या पचनी ही गोष्ट पडायला अजून काही पिढ्या जाव्या लागतील. असो! लेख मनापासून आवडला. आणखी लिहा आम्ही वाट बघत आहोत.