मुद्दा १.

मराठी भाषेची परीक्षा दिली तरी फारसा फरक पडेल असे वाटत नाही. कारण आजनुकर्ण म्हणतात तेच खरे आहे. आपणच जर हिंदीतून सुरुवात केली तर समोरचा कशाला मराठी बोलेल ?

मुद्दा २.

विमानाचा अनुभव नाही. पण रेल्वे किंवा बस मधून प्रवास करताना किंवा इतर वेळीही  मी स्वतः तरी समोरच्याशी मराठीतूनच बोलायला सुरुवात करते. तो मराठीत बोलला नाही तरी त्याला मराठी समजत असते. कारण हिंदी आणि मराठीत विशेष फरक नाही. अगदी फळवाला भैया असला तरीही. आणि अगदी धरून चालू की तो नाहीच मराठी बोलला तरी आपण बोललो तरी काही फरक पडत नाही. रिक्षावाल्याला आपले ठिकाण समजण्याशी कारण.

बाकीच्या मुद्द्यांबद्दल आजानुकर्णांशी सहमत.