चांगले लिहिले आहे. थोडे गुळमट आहे, कारण इतक्या सहजी रुळ बदलणे घडत नाही, खडखडाट होतोच. पण तो किती प्रमाणात होऊ द्यावा, हे त्या दोन्ही कुटुंबांवरती अवलंबून असते. माझ्या स्वतःच्या घरात हे घडलेले आहे. माझी आई मी सातवीत असतानाच गेली आणि घरी कर्ते इतर कुणी नसल्याने बाबांनी पुनर्विवाह केला. खडखडाट झाला पण कुटुंबियांनी तो वेळच्यावेळी सावरला आणि आज सगळे सुरळीत चालू आहे. हे उदाहरण वरच्यापेक्षा थोडे वेगळे आहे पण साथीदाराची गरज, हक्काचे माणूस वगैरे मुद्दे सारखेच आहेत.
लेखातल्या परिस्थितीशी पूर्णपणे सारखे उदाहरणही घरातच आहे. माझे सासरेही माझा नवरा सातवीत असतानाच गेले, मोठ्या दोघी नणंदा महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. सासूबाई नोकरी करत होत्या. मुले तशी मोठी असल्याने घरच्यांनी पुनर्विवाहाचा सल्ला तेव्हाच दिला होता. पण सासूबाईंना तेव्हा आवश्यकता वाटली नाही. पुढे मुलींची लग्ने झाली, मुलगा उच्चशिक्षणासाठी बाहेर पडल्यावर मात्र एकटेपणा जाणवू लागला. तेव्हा त्यांनी स्वतःच जोडीदार निवडून पुनर्विवाह केला. मात्र यावेळेस मुलींच्या सासरी, समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली. कालांतराने खडखडाट संपला, वरती शेवटील परिच्छेदातील परिस्थितीही आज सारखीच आहे. पण उदाहरण एवढ्यासाठीच दिले की मराठीप्रेमींना अतार्किक वाटते तसे ते नाही, वास्तवातही हे घडते. माझ्या घरातील उदाहरणे अनुक्रमे २५ आणि १५ वर्षे जुनी आहेत. म्हणजे आज तर हे घडायला आणि स्विकारल्या जायला काहीच हरकत नसावी.