दिल्याबद्दल धन्यवाद.
लोकांचे सल्ले, आणि त्यांचे कंसातले स्वगताचे प्रतिसाद खूपच छान.
पण डोळ्यासमोर येते ती अंधेरी की अंधारी?
आणि रोग निदानित झाला ह्यात निदानित हा शब्द तितकासा योग्य वाटत नाही. रोगाचे निदान झाले असे म्हणणे योग्य वाटते.
हे सगळे छिद्रान्वेषण म्हणून लिहिले नसून, तुम्ही नेहमीच चांगली मराठी वापरता, मराठी प्रतिशब्दांबद्दलही जागरूक असता, म्हणून तुमच्याकडून बारीक-सारीक तपशीलही नीट लिहिले जाण्याची अपेक्षा आहे म्हणून. त्यामुळे राग मानू नका.
हृदयरोगाच्या उपचारांतून कायमचे मुक्त झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन.