मराठीप्रेमींसाठी आणखी एक नमूद करायचे विसरले ते म्हणजे जेव्हा सासूबाईंनी पुनर्विवाह केला तेव्हा माझ्या आजेसासूबाईही हयात होत्या. आप्पांच्या, म्हणजे ज्यांच्याशी पुनर्विवाह केला त्यांच्या आईही हयात होत्या. थोडक्यात दोन दोन सासूबाई आणि दोघीही पारंपरिक विचारांच्या. शिवाय इकडचे दोन व्याही आणि तिकडेही दोन व्याही. खडखडाटात हेदेखील मुद्दे आलेच. पण झाले सगळे किंवा निभावले सगळे नीट. आयुष्यातले चढउतार संपल्यावर जवळच्या सर्वांमध्ये असतानाही वैयक्तिक असं कुणीतरी हवं असं वाटणं अगदी शक्य आहे. प्रॅक्टिकली आणि लॉजिकली विचार केलात तर सगळे प्रॅक्टिकल वाटेल.