आपले लेखन मला नेहमीच जीवनशैली परिवर्तनासाठी उद्युक्त करते. आपला अनुभव प्रेरणादायक आहेच पण आपल्या कटाक्षाने मराठी शब्द वापरण्याच्या आग्रहाचे (उदा. कलंकहीन पोलाद, उद्वाहक) कौतुक वाटते.
एक मधुमेही म्हणून बाळबोध प्रश्न असा. बहुतेक मधुमेही लोक बिनसाखरेचा चहा पिताना दिसतात किंवा डॉक्टर लोक २ चमच्यांपेक्षा जास्त साखर खाऊ नका असा सल्ला देतात. एक रसायनशास्त्री म्हणून सांगतो की खाल्लेल्या एक वाटी भातापासून किंवा दोन पोळ्यांपासून, साबुदाणा, बटाता यांच्यापासून कितीतरी जास्त साखर तयार होते मग चहातून २ ऐवजी अगदी ३-४ चमचे साखर गेली तर काय बिघडणार आहे? तसेच अगदी २ चमचे इतक्या कमी तेलतुपाचा आग्रह पण मला थोडासा अवास्तव वाटतो.
अर्थात तुम्हाला परिणाम दिसला हे महत्त्वाचे.
विनायक