उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
मोठ्या माणसांना एक क्रूर सवय असते. लहान मुलं मजेत खेळताना दिसली की त्यांना काम सांगायचं.
मी व स्नेहा अशा कितीतरी प्रसंगांतून पळ काढायचो. पण या कामांतही काही सोपी कामं आम्ही फक्त कौतुक व्हावं या एकाच हेतूने आनंदाने करायचो. त्यात अज्जीची जवळपास सगळी कामं असायची. अज्जी नेहमी साधी कामं सांगायची. कुठेतरी पळत जात असेन तेव्हा तिची, "ए साय", अशी गोड हाक यायची. मग तिच्या खोलीत गेलं की ती सुई-दोरा घेऊन बसलेली दिसायची. "मला एवढा दोरा ओवून दे गं" असं मऊ बोलायची. त्याला नाही म्हणताच यायचं नाही. उलट दोन तीन वेळा दोरा ओवता आला असता तर अजून बरं झालं ...
पुढे वाचा. : मदत