घडा हा शब्द केवळ नमनाला घडाभर तेल एवढ्यापुरताच वापरला जातो असे नव्हे तर घडा हा शब्द तसा प्रचलित आहे. पालथ्या घड्यावर पाणी, पापाचा घडा इ. म्हणजे त्याचे संदर्भ इतरही विस्तृत प्रमाणात दिसतात.
धडा ह्या शब्दाचे तसे आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकातल्या धड्याव्यतिरिक्त इतर कोठे हा शब्द मी वाचल्याचे/ऐकल्याचे आठवत नाही.
तुम्हाला असे (मननातला आणि नमनातला धडा सोडून!) इतर संदर्भ माहित असले तर कृपया सांगा.