हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:

बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

भगवंतांनी उद्धवाला सज्जनांची, साधूंची, संतजनांची २८ लक्षणे सांगितली. पुढील (३२ व्या) श्लोकात या साधुजनांतही श्रेष्ठ कोण, त्याचे विशेषत्व ते काय हे सांगतात. "मी व माझे भक्त यांच्याकडून सांगितलेल्या गेलेल्या गुणांचे व दोषांचे (हे वर्ज्य म्हणून टाळण्यासाठी) यथार्थ ज्ञान करून घेऊन स्वविहित अशा भागवत धर्माचरणाचे फलही माझ्या चरणी समर्पण करून माझी सेवा करतो तो पुरुष साधुजनांत श्रेष्ठ. अशा भक्तांचा भजनभाव कसा असतो ? तर, माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच. ...
पुढे वाचा. : बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)