पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
जुगार-मटकेवाल्यांवरील कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून हप्ते घेणारे पोलिस, अटक टाळण्यासाठी तडजोडी करणारे पोलिस, अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने चालविणारे पोलिस, ढाबे चालविणारे पोलिस, विविध व्यवहारांमध्ये दलाली करणारे पोलिस, फार तर काम सोडून एखादा जोडधंदा किंवा घरची शेती पाहणारे पोलिस, अशी पोलिसांची विविध "रूपे' यापूर्वी ऐकण्यात, पाहण्यात आली होती; पण नगरच्या पोलिस मुख्यालयात स्वतःचाच अड्डा चालवून जुगार खेळणारे पोलिस, हे नवे रूपही नुकतेच पाहायला मिळाले. ज्यांनी बाहेरच्या जुगार अड्ड्यांवर छापे घालून अवैध धंदे मोडून काढायचे, तेच पोलिस सरकारी ...