पुणेकरांचे फाजील लाड होतात हेच खरे!

सहमत!
वाहनांची अमर्याद गर्दी, बेशिस्त वाहतूक, ढिसाळ सार्वजनिक वाहनव्यवस्था, यावर उपाय म्हणून शोधलेले बीआरटीसारखे धरसोडीचे उपाय (ज्यांने अनेक निष्पापांचे बळीही घेतले) , यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पोलीसांचा अभाव, कचराडेपोचे सनातन प्रश्न, खड्ड्यातले रस्ते, स्वाईन फ्लूमुळे दररोज मृत्यूमुखी पडणारे सरासरी २-३ नागरिक (प्रामुख्याने विद्यार्थी व तरुण), गणपती व आता नवरात्रौत्सवामुळे होणारे ध्वनीप्रदूषण ही सर्व लाडाचीच लक्षणे आहेत. आता तरी पुणेकरांना कोणीतरी सरळ करायला हवे बुवा!