महेश, प्रतिसादाखातर धन्यवाद!

स्टेनलेस स्टीलचा शब्दशः अनुवाद कलंकहीन होतो म्हणून तो वापरला.

तुम्ही सुचवलेला निष्कलंक पर्यायही स्वीकारार्ह आहेच.

पण गंजनिरोधक म्हणणे जास्त समर्पक ठरेल! असे मला वाटते.

तरीही एकेका शब्दाखातर १०-२० मराठी पर्याय उपलब्ध असून त्यांचा निरनिराळ्या संदर्भात निरनिराळ्या शब्दच्छटेबरहुकूम वापर करता येत असेल तरच मला माझी भाषा समृद्ध झाल्याचे जाणवेल.

म्हणून तुमच्या सूचनेचे मनःपूर्वक स्वागत.