अहो रसायनशास्त्रज्ञ, ऊर्जा असणे व ती उपलब्ध असणे निराळे असते!

कुठलीही कर्बोदके साखरेइतकीच ऊर्जा धारण करत असतील तरीही त्यातील ऊर्जाविमोचन सावकाश होते आणि त्या ऊर्जेचे अवशोषण यथावकाश, यथावश्यक परिमाणात होते, तर साखर रक्तात सरळच उतरून तत्काळ ऊर्जा निर्माण करून ऊर्जास्फोट घडवते मात्र हवी तशी सावकाश विमोचित होत नसल्याने विसृतकालवापरास ती त्यामुळेच उपयुक्त ठरत नाही. दिवसाला दोन वेळ भरपेट जेवणे योग्य समजत नाहीत. तर दिवसभर गरजेनुरूप चरत राहण्याकरताच सोयीची, अशी मानवी देहाची निर्मिती झालेली असते.

मुळात शरीरातील अतिरिक्त प्रमाणात साठलेले अनावश्यक पदार्थ, शरीरास त्यांचा तुटवडा निर्माण करून शरीरातूनच त्यांचा वापर सुरू करण्यास उद्युक्त करण्याच्या प्रक्रियेस जीवनशैली परिवर्तन म्हणतात. तेव्हा अन्नपुरवठ्यातून त्यांना नामशेष करून (खरे तर शून्य पुरवठा करूनच) उत्तमरीत्या साधता येते.

शिवाय, मानवनिर्मित संहत (कॉँसेंट्रेटेड) पदार्थ शरीरास अपायकारक सिद्ध झालेले आहेत. ते विरल करून खाणेच योग्य. मधमाशाही फुलातील मधाला पातळ करून खातात. मनुष्य मात्र अर्क, आसव, अरिष्टे, रस इत्यादी संहतीकरणाने आपलेच अपरिमित नुकसान करून घेत असतो. तेल, तूप, साखर, मीठ ह्या कृत्रिम पदार्थांचा पूर्णतः त्याग आपण करू शकू तो सुदिन!