(तुमचे पर्यायी मराठी शब्द तर अतिशय समर्पक आणि सुंदर)>> खूप खूप धन्यवाद!

होय मी तीच जीवनशैली कायमची स्वीकारलेली आहे. मात्र अंमलबजावणी हल्ली काहीशी शिथील झालेली आहे. कधी कधी बायको मुलगा "कर्मठपणा कमी झाला" म्हणून चिडवतच असतात. आहाराचे निर्बंध मानले तर ते जाचक ठरतात. पथ्थ्यकर मानले तर आवडू लागतात. सुरूवातीस दुधीचा रस बेचव आणि निरर्थक लागणारा मी, आता त्यातील गोडीही अनुभवू शकतो. कदाचित कायमच संहत पदार्थ सेवनास सरावलेली रसना, विरल पदार्थांतील नैसर्गिक स्वादास पारखी होत असावी.