१. हिटलरमुळे स्वातंत्र्य मिळाले का? असा प्रस्ताव आहे. त्याबद्दल आपले मत समजले नाही. असो.
२. आपण दिलेल्या दुव्यावरून भारताची अर्थव्यवस्था ढेपाळत आहे इतकेच सिद्ध होते. गांधींच्या तत्त्वज्ञानानुसार चाललो असतो तर आत्ता कदाचित आपण आंतरजालावर असे लिहूही शकलो नसतो. स्वयंपूर्ण व स्वावलंबी खेडी असली की कसलीच गरज भासत नाही हे त्यांचे अव्यवहार्य तत्त्वज्ञान होते. फार पुर्वी लोकांना ऍनेस्थेशिया न देताच शस्त्रक्रिया करायचे. तसे काहीतरी आजही असते. म्हणजे, फोन करायचा असेल तर तो बूक करून ठेवा. त्याच्यापाशी साडे तीन तास थांबा वगैरे!
३. आता जर कुणी म्हणत असेल की गांधींच्या स्वावलंबी तत्त्वज्ञानेही हे मिळवू शकलो असतो तर ते शक्य नाही. कारण भारतात अनेक गोष्टींचे तंत्रज्ञान इतर देशातून आले, अनेक गोष्टींचे कारखाने इतर देशांमुळे उभे राहिले. तेव्हा, आपल्यापुढे जे आहेत त्यांची मदत घेतल्याशिवाय आपण स्वावलंबी होऊच शकलो नसतो. मग त्या स्वावलंबीपणाला काय अर्थ आहे? मुलाला नोकरी लागल्यावर तो वडिलांना म्हणाला की मी स्वावलंबी आहे तर त्याला काही अर्थ आहे का?
४. इंग्रज किती दूरदृष्टी असलेले धोरणी लोक होते हे शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्ञात आहे. त्यांनी 'ही वसाहत सोडणे' हा वेडेपणा मुळीच केला नसता. आपल्या स्वातंत्र्यवीरांचे प्रयत्न संघटीत व एकाच काळातील नव्हते. टिळक-तत्वज्ञान अस्ताला जात असताना गांधींचा
उदय होत होता. जालियनवाला हत्याकांड हे इंग्रजांच्या वृत्तीचे चांगले निदर्शक आहे. अगदी मोगल इतिहासापासून पाहिले तरीही जाणवेल की हिंसेनेच राज्य घेतली गेली आहेत व हिंसेनेच स्वतंत्र झालेली आहेत. हिटलरने इंग्रजांना सळो की पळो करून सोडल्यामुळेच इंग्रजांना देश सोडावा लागला. आपल्या लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात बहुतांशी वेळा मार खाल्लेला आहे.
गांधींचे तत्त्वज्ञान असे होते की जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाने जर ते मान्य केले तरच ते टिकेल, अन्यथा नुसती मारामारी!
-बेफिकीर!