असे काही होत नसते. एकदा माणूस मेला की संपले. कशासाठीही तो परत येत नाही असे माझे ठाम मत आहे. मोठ्यांच्या बोलण्याचा परिणाम म्हणून आदित्यला तो भास झाला. त्याला जे दिसले ते त्याच्या सोबत असणाऱ्या त्याच्या भावांना का नाही दिसले? तसे बघितले तर माणसाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. माणूस हा सर्वात लोभी प्राणी आहे. त्यामुळे असे काही होत असते तर पृथ्वीवर माणसांच्या बरोबरीने भुते वावरली असती.