जीवनगंधा,
खूप सहजतेने कथा मांडली आहेत, वाचून छान वाटले आणि थोडा आशावाद जागृत झाला! अशा कथा फार थोड्या वाचनात येतात खरंच, आणि प्रत्यक्षात येणे जवळजवळ NIL.
अजूनही आपल्या समाजात स्त्रीचा पुनर्विवाह सहजतेने स्वीकारला जात नाही हे दुर्दैवी, पण वास्तव आहे. आजच्या स्त्रीला जी सामाजिक बंधने आहेत त्यांत पूर्वीपेक्षा वाढच दिसून येते - उदा. लग्नापूर्वीचे शील - संस्कार तर आहेतच, त्याशिवाय लग्न सुस्थळी व्हावे म्हणून (हे बहुधा ९५% उदहरणांत - ५% वेगळेपणा फार फार तर) शैक्षणिक पात्रता, नंतर चांगली नोकरी पण पाहिजे जी लग्नानंतर सासर / पतीराजांचा आर्थिक भार सांभाळू शकेल! करियरचे गोंडस नाव लावून तिचे व्यक्त / अव्यक्त पणे शोषणच होत राहते (थोडेसेच सन्माननीय अपवाद सोडून). लग्नानंतर मुले, नोकरी सांभाळून त्यांचे संगोपन, त्यांची लग्नकार्ये इ. इ. मध्ये तिचे ४०-५०-६० पर्यंतचे जीवन झिजत राहते. आजच्या काळाप्रमाणे मुलेही शिक्षण इ. वय वाढते होईपर्यंत घेऊन मग लग्न करतात, म्हणजे स्त्रीचे तोपर्यंत अडकणे आलेच. या नंतर जर एकाकीपणा आला तर तोही तिने तोंड दाबून सहन करावा आणि कुढत जगावे अशी अजूनही सामाजिक मानसिकता दिसून येते. अशा परिस्थितीत तिने 'फार फार तर आपले जुने (म्ह. लग्नानंतर मारले गेलेले! ) छंद जोपासावे, देवाचे करावे, मुलांचे सुख पाहून खुश व्हावे' असेच सल्ले समाजातून तिला मिळतात. तिला तिची अशी सहजीवनाचीसुद्धा गरज असेल हे कोणी विचारतही घेत नाहीत!
आपली कथा या सर्व सामाजिक कुविचारांना बदलणारी ठरावी ही शुभेच्छा!
-मीसुची.