साधारण एक दशकापेक्षाही कमी काळापूर्वी, विकिपीडिया अस्तित्वातही नव्हता यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे. सध्या ३३ कोटी व्यक्ती दर महिन्यात विकिपीडियाचा उपयोग करतात ज्याद्वारे विकिपीडिया जगातील सर्वात जास्त वारंवार वापरला जाणारा ज्ञानाचा स्रोत ठरला आहे. गेल्या आठ वर्षात लक्षावधी स्वयंसेवकांनी त्याची बांधणी केली व वेगवेगळ्या विकिमीडिया प्रकल्पांचे सुचालन केले.

विकिपीडियाने असे बरेच साध्य केले तरीही, आपणास अश्या जगाची निर्मिती करायची आहे की ज्यात प्रत्येक मनुष्याला जगातील सर्व ज्ञानाची मुक्तपणे देवाणघेवाण करता येईल. या आव्हानास सामोरे जाण्यासाठी व त्यात यश मिळविण्यासाठी आपण कशी तयारी करणार?

सध्या जगाच्या एक पंचमांश लोकसंख्येस आंतरजाल (Internet) उपलब्ध आहे. लाखो स्वयंसेवकांनी विकिमिडिया प्रकल्पांत योगदान केले असले तरी ते जगाच्या लोकसंख्येचे हे पूर्णपणे प्रतिनिधित्व करीत नाहीत. यासाठीच्या ही मुक्त ज्ञानाच्या निर्माणाची व वापराची जगभर पसरणार्‍या जागतिक चळवळीवर काम सुरू करू, तेंव्हा त्यास अनेक पर्याय पुढे येतील. हे समजून घेण्यासाठी आम्ही सुमारे एक वर्ष चालणारी एक व्यूहात्मक योजना विकिमिडिया संस्थे अंतर्गत सुरू केली आहे. यात खालील गोष्टींचा समावेश आहे -

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास आम्हाला मदत करा. त्यांचा शोध घ्या, त्यांचे विश्लेषण करा, आमची दृष्टी व आमच्या मूल्यांच्या दृष्टिकोनातून ते काय आहेत यावर प्रकाश टाका. ही मदत करण्याचे खालील पाच मार्ग आहेत:

यामुळे तुमच्याशी तुमच्या सवडीने माहितीची देवाणघेवाण करणे सुकर होईल.

जर आपण सहभागी होऊ शकत नसाल, तर आपण या अत्यावश्यक प्रकल्पास देणगी देण्याबद्दल विचार कराल काय? आपली देणगी आमच्या वैश्विक मुक्त ज्ञान विषयक योजनांना सोपा आधार पुरवेल. आम्हांस आमच्या प्रकल्पांतील आमचे तंत्रज्ञान सुधारविण्यास तसेच आमच्या कामास इतर विविध तर्‍हेने आधार देण्यास स्वयंसेवक सुद्धा हवे आहेत.

या शतकात, आम्हांस आपली संस्कृती बदलण्यास आणि सर्व मानवांसाठी एकसारख्या संधी निर्माण करण्याची विस्मयकारक संधी दिलेली आहे. आम्हांस वाटते की, जगातील प्रत्येकाने ज्ञानदानाच्या या कामात आमच्या सोबत यावे.


आपला
मायकेल स्नो
अध्यक्ष,विकिमिडिया फाउंडेशन
जिमी वेल्स
संस्थापक,विकिपीडिया तसेच विकिमिडिया फाउंडेशन

दुवा क्र. १