मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
चारुलता हा सत्यजित रायचा सिनेमा मी फक्त एकदाच पाह्यला होता. त्यावेळी रिळं लावताना काही तरी गडबड झाली होती. अर्थात तरीही त्याची मजा कमी झाली नव्हती. त्यानंतर चारूलता बघायचा राहून गेला. त्यातलं एक गाणं... ओ बिदेशिनी... अंधुकसं आठवत होतं आणि चारुलता बागेत झोपाळ्यावर बसून अमोलशी बोलत असते तो शॉट मनात ठसला होता. रविंद्रनाथांच्या नष्टनीड या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. ही कथा कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे शाळेत असताना वाचली होती. पण नीट आठवत होती. मध्यंतरी पुण्याहून मुंबईला येताना सतीश तांबेकडे गेलो होतो. त्याच्याकडे सत्यजित रायच्या चित्रपटांच्या ...