रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:
लोकांकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा माझ मन एक वेगळाच खेळ खेळत असत. हा जो मनुष्य माझ्या समोर उभा आहे तो या स्थितीत कसा पोचला. समोर भिकारी असेल तर तो भिकारी कसा झाला? त्याचे आई-बाबा पण भिकारीच होते का? त्याच लहान पण कस गेल असेल? भिक मागण्यातच का? तो लहान असतांना समाज स्थिती कशी होती? समोर चांगल्या पोषाखात कोणी उभा असेल तर त्याने तरूणपणात कुठले निर्णय घेतले असतील? की तो श्रीमंत घरात जन्मला होता आणि आयुष्यभर एक काडी इकडची तिकडे न करता तो ऐष करत जगला? अर्थात मी प्रत्येकाला जाऊन "तुम यहां पर कैसे पोहोचे?" अस विचारत नाही. तसं करण थोड विनोदीच ठरेल ...