यादगार
तुमचे विचार वाचले परंतु मला वाटते सरसकट सगळ्यांसाठी मातृभाषेतुन शिक्षण हे फ़ायद्याचेच असते हे म्हणणे धाडसाचे ठरेल. तसे आज आपण जे पदवी पर्यंत जे शिक्षण घेतो ते नोकरी किंवा धन्दा करण्या मध्ये कितपत उपयोगी आहे हा पण एक चर्चेचा विषय आहे. ज्याला जे आवडेल ते करावे. माझे तर असे मत आहे की आजकाल काही फ़रक पडत नाही .आजकाल तर जेव्हा जे हवे ते त्या भाषे मध्ये मिळते. संस्कार आणि मुल्यांसाठी ज्याने त्याने आपल्याला योग्य आणि सोईस्कर मार्ग स्विकारावा. संगणक युगाने देशांच्याच नव्हे तर भाषेच्या पण भिंती पुसट केल्या आहेत. तेव्हा मुलाला हट्ट म्हणून कुठल्याचं गोष्टिंची सक्ति करु नये.
उदाः आजकाल बरेचं लोक परदेशी राहतात नोकरी च्या निमित्ताने. कालांतराने ते जेव्हा भारतात परत येतिल तेव्हा त्यांची मुले मराठी शाळे मध्ये कितपत यश मिळवतील?
तुम्ही सांगायचे आधिच हे मान्य करतो कि अशी मंडळी ही पुर्ण समाजा चे चित्र नाही पण बाकी च्यांना सुद्धा जे सोयिचे आहे तेच त्यांनी करावे. कुठला ही न्युनगंड न बाळगता. मराठी मध्ये शिकले काय आणि ईतर भाषे मध्ये काय? व्यवहारिक समज असायला हवी.
आणि दुस-या एका संवादा मध्ये कोणितरी लिहिलेच आहे की आपण शिक्षण का घेतो आहे हे जास्त महत्वाचे आहे. त्यानंतर ते कुठल्या भाषेतुन हे ठरवता येऊ शकते.