त्यांच्यातलाच कोणीतरी माझ्यासारखा वात्रट माणूस. भीतीनें मनाचा कबजा घेतला कीं अंधश्रद्ध माणसाच्या मनांत भुताचा उगम होतो. व्यसनें, मादक पदार्थ ने आण करणारे लोक, अनैतिक संबंध ठेवणारे, वेश्या इ. लोकांचा अंधारांत अवेळीं मुक्त वावर असतो. त्यापैकीं एखादी व्यक्ती दिसली कीं यांच्या मनांत भुताचा जन्म होतो. आपल्याला कोणी ओळखूं नये म्हणून तेहि भुताचें सोंग वठवतात. असा माझा पैज लावल्यामुळें मिळालेला अनुभव आहे.

सुधीर कांदळकर.