कथा सरसकट घडणारी आहे असे अजिबात नाही पण तसे नावीन्यही नाही. तरीही लिहिण्याच्या शैलीमुळे वाचनीय झाली आहे. तसेच शेवट सकारात्मक दृष्टिकोनाकडे झुकणारा आहे ते विशेष आवडले. लिखाणातील सहृदयता पाहून कथा सत्यघटनेवर आधारित असावी असे वाटते.