Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
इंटरनेट एक्स्प्लोरर (आयई)ऐवजी फायरफॉक्स वापरा असे मी अनेक वेळा सांगितले आहे. पण असा ब्राऊझर बदलताना आधीच्या ब्राऊझरमध्ये कष्टाने जमविलेले बुकमार्क नव्या ब्राऊझरमध्ये कसे आणायचे? एकेक आणत बसायचे तर ते खूप वेळखाऊ असते. त्यापेक्षा ही सोपी पद्धत अवलंबायला हरकत नाही. समजा तुम्ही आयई वापरता आहात आणि त्यातले बुकमार्क तुम्हाला फायरफॉक्समध्ये ट्रान्स्फर करायचे आहेत. आयई उघडा. 'फाईल'मध्ये जाऊन एक्स्पोर्टवर क्लिक करा, नंतरच्या बॉक्समध्ये फेवरिट्सवर क्लिक करा व पुढे जा. ती एचटीएम फाइल कुठे सेव्ह करायची ते ठरवा. समजा डेस्कटॉप. ओके म्हणा व आयई बंद ...