Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
तुम्हाला तुमचा कम्प्युटर कासवगतीने चालतो असे वाटते का? मग अनावश्यक फाइल्स काढून टाकण्याचे काही मार्ग आहेत. त्याबद्दल मी मागे सविस्तरपणे लिहिलेच आहे. त्यातच काही उपायांची भर टाकत आहे. काही वेळेला या अनावश्यक फाइल्स कुठे आहेत ते कळत नाही. किंवा कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे ते लक्षात येत नाही. प्रत्येक फोल्डरवर राइट क्लिक करून प्रॉपटीजवर जायचे आणि फाइल फोल्डरचा साइझ पाहात राहायचा ही बाब फारच कंटाळवाणी आणि वेळखाऊ असते. अशावेळेस मशीनमधल्या सगळ्या फोल्डरचे साइझ एकाच दृष्टिक्षेपात दिसले तर? त्यासाठी 'फोल्डर साइझ' हा प्रोग्राम डाऊनलोड करा. ...