माधवकाका,
तुम्ही शास्त्र सांगितलेत, त्यातले विज्ञान पण सांगा ना!
रेशीम अथवा लोकरीच्या वस्त्रांचा आग्रह त्यांच्या घर्षणाने तयार होणारे स्थिरविद्युत (स्टॅटीक इलेक्ट्रिसिटी) आणि त्याचे रक्ताभिसरणावरचे परिणाम यांच्याशी संबंधित असावा काय?
रेशीम, लोकर, नायलॉन यांचे कपडे घातले की स्थिरविद्युत तयार होते... आणि मग इतर कोणाला किंवा विजेच्या सुवाहकाला स्पर्श केला की छोटीशी ठिणगी उडून छोटासा झटका बसतो. आणि मग आपल्यातून ते स्थिरविद्युत निघून जाते (ग्राउंडींग). म्हणून पूजा करतांना इतरांना शिवायचे नाही आणि हेच ते सोवळे, असे असेल का?
पण हे स्थिरविद्युत चे विचार "धूतवस्त्र" मग जे सुती पण असू शकते, त्याला लागू नाही होत.
का श्लोकात असे म्हणायचे आहे की "रेशमाचे किंवा लोकरीचे धुतलेले वस्त्र वापरावे" ? पण "तथैव च" मुळे तसे प्रतीत होत नाही?
नक्की विज्ञान काय आहे? आम्हाला सांगाल का?