उदाः आजकाल बरेचं लोक परदेशी राहतात नोकरी च्या निमित्ताने. कालांतराने ते जेव्हा भारतात परत येतिल तेव्हा त्यांची मुले "मराठी" शाळे मध्ये कितपत यश मिळवतील ?...... ज्याने त्याने आपल्याला योग्य आणि सोईस्कर मार्ग स्विकारावा.... ज्याला जे आवडेल ते करावे..... संगणक युगाने देशांच्याच नव्हे तर भाषेच्या पण भिंती पुसट केल्या आहेत. ...... - सन्दीप पाध्ये
श्रीमान् संदीप पाध्ये,
आधी मी काय लिहिले आहे ते जरा परत एकदा वाचून बघा
मी 'मराठीतच' शिका असे कुठेही सांगितले नाही, ज्याची जी मातृभाषा आहे त्यातच त्याने शिक्षण घावे हा माझा मुद्दा आहे.
शिवाय परदेशात भारतीयांनी काय करावे हा मुद्दा मी चर्चेला घेतलेला नाही. याचे कारण असे आहे की तिथे गेलेले लोक इथून शिकून जातात. ते परत येतील याची खात्री नाही. त्याच बरोबर तिथे स्थाईक झालेले आईबाप तिथल्या भाषेनुसार मुलांना तिथल्याच भाषेत शिक्षण देतील.
कादाचीत त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढिची मातृभाषा बदलून त्या परदेशाची भाषाच झाली असेल. त्यावेळी ते त्यांच्या मातृभाषेतूनच शिकतील जी कादाचित भारतीय नसेल, पण त्या पिढिची मात्र ती मातृभाषाच झालेली असेल.
याचे उदाहरण भारतातच आहे बाहेरही जावे लागणार नाही. तेलगू यादव ही जात आंध्र प्रदेशातून तमिळनाडूत ७५ते ८० वर्षापूर्वी कायमची व बऱ्याच प्रमाणत स्थाईक झाली. आता त्याची दुसरी व तिसरी पिढी स्वतःची मातृभाषा तेलगू न मानता तमीळ मानते. त्यांना तर तेलगू बोलताही येतही नाही.
तसेच मी महाराष्ट्रीय आहे व आमचे पूर्वजही. पण त्यातील काही बेळगाव-कर्नाट्कात स्थाईक झालेले असल्याने, ते व त्यांची मुले स्वतःची मातृभाषा कानडी संगतात.
आता मुद्दा हाच आहे की आपण कुठे चुकलो व चुकतो.
भारताच्या बाहेरून जे इथे येउन स्थाईक झाले ते आपल्या मातृभाषेत शिकून आले व इथे येऊन त्यांनी त्यांच्या मातृभाषेचा त्याग केला नाहीच तर उलट प्रसारच केला व त्यांच्या मातृभाषांच्या शाळा देखील सुरू केल्या. (अपवाद ज्यू)
या उलट आपण मात्र देश सोडून जातो तेव्हा आपली मातृभाषा इकडेच सोडून जातो. जी मातृभाषा नेतो ती फारच मर्यादित स्वरुपात प्रसारित होते व वापरली जाते- आणि ज्याने ज्याला जे पाहिजे ते करावे असे मोठेपणा मिळ्वायला म्हणत बसतो व स्वत:ला जे करायला पाहिजे ते करतच नाही.
म्हणजेच आपल्या मातृभाषेची भिंत आपण पुसट केली संगणाकाने नव्हे.
-यादगार