दुपारचा वेळ रिकामा असेल तर, प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी पाळणाघर, अभ्यासघर चालवता येईल. माझ्या एका पुण्यातल्या मैत्रिणीचा मुलगा अश्या एका काकूंकडे शाळेतून आल्यावर जातो. तिथे दुपारचा खाऊ, झोप आणि अभ्यास असा कार्यक्रम असतो.