आ. भोमेकाका,

तुमच्या शंकांबद्दल या विषयाच्या अनुषंगाने असे सांगावेसे वाटते कि या प्रकारची मीमांसा करताना आपण केवळ  आधुनिक - ( खरे तर प्रायोगिक म्हणावेसे वाटते) भौतिक विज्ञानातील प्रस्थापित सिद्धांत वा उर्जारुपांचा विचार करणे सयुक्क्तिक होणार नाही, (उदा. विणलेल्या रेशमी पटावरील केवळ स्थिरविद्युतचे अस्तित्व) तर या गोष्टिंचा अभ्यास केल्या जाणाऱ्या "आधिभौतिक" तसेच "परामानसशास्त्र" (तथाकथित "थिऑसॉफी") वगैरे विषयांतील वर्तवलेल्या (ज्या आत्ता कदाचित अशक्य भासत असतिल.) शक्यताही विचारात घेणे आवश्यक आहे असे वाटते. (उदा. ईथरसारख्या माध्यमाचे आस्तित्व.)

उर्जेच्या खेळाचे सगळे नियम आपल्याला अजून कळलेत कुठे?

आपला शोधक सहकारी.