Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
आवाजाच्या सलग ऍनॅलॉग सिग्नलची अतिशय भरभर (दर सेकंदाला ८०००) अशी मोजमापं केली आणि त्या प्रत्येकांची आठ बिट्सच्या बायनरी भाषेत रुपांतर केलं, की ऍनॅलॉग आवाजाचं डिजिटलमध्ये रुपांतर होतं. मग ही बिटस् बाकीच्या बिटससारखीच कम्प्युटरच्या मेमरीत किंवा हार्डडिस्कवर साठवता येतात. पण गाणी एकीकडून दुसरीकडे न्यायची असणारी टेपरेकॉर्डरच्या कॅसेटमधली सोय या बिटस् आणि बाईट्सच्या रूपातल्या गाण्यांसाठी सुध्दा लागणारच की ! आणि त्यातूनच 'कॉम्पॅक्ट डिस्क' किंवा सीडीचा जन्म झाला.