"दुर्गे दुर्घट भारी" ही देवीची आरती नरहरी सोनारांनी रचली आहे (नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा), तर " जय देव जय देव जय पांडुरंगा" विठ्ठलाची आरती नामदेवांची (केशवासी नामदेव भावे ओवाळिती). कालानुक्रमे नामदेवांनी रचलेली विठ्ठलाची आरती मराठीतली पहिली असावी. "त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा" ही दत्ताची आरती एकनाथांनी रचली आहे (एका जनार्दनी श्रीदत्त जाण) तर "आरती ज्ञानराजा" ही ज्ञानेश्वरांची आरती जनार्दनस्वामींनी रचली आहे.

रामदासस्वामींनी बऱ्याच आरत्या रचल्या ही गोष्ट खरी असली तरी कालानुक्रमे त्या पहिल्या नाहीत.

विनायक