आजकाल, पाण्यातून वीज पाठवून उदजन निर्मिती करण्यात येते. ह्याला विद्युत
विघटन म्हणतात. या प्रक्रियेत, निर्मित उदजनाची किंमत, निर्मिती
निरुत्साहित व्हावी एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय जास्त असते. पाण्याचे
तापमान खूप जास्त उंचावले जाते, जिथे पाण्याचे रेणू उदजन व प्राण वायूच्या
मूलकांमध्ये विघटित होतात. उदजन मूलके धन असतात तर प्राण वायू मूलके ऋण
असतात. धनाग्र व ऋणाग्रांच्या योग्य जोडणीद्वारे उदजन वायू-टाकीत उच्च
दाबाखाली जमा करता येतो. तांत्रिकदृष्ट्या जर ही प्रक्रिया यशस्वी करता
आली तर उदजन उत्पादनही स्वस्त होऊ शकेल.
हा आपल्या लेखातील परिच्छेद...
ह्यातील उदजन हा शब्द (ही संकल्पना) आणि एकुणातच ही प्रक्रिया समजली नाही.
घाई नाही. आपल्या मोठ्या रजेनंतर सवडीनं समजावावे.
धन्यवाद.
(ढ आणि जिज्ञासू) ग्रामिण