करून गेलो गाव आणि बाबुरावचो नाव येथे हे वाचायला मिळाले:
काल रात्री आशुतोष गोवारीकरचा 'व्हॉट्स युवर राशी' पहिला. मी तसा चित्रपट वेडा नाही पण ठराविक दिग्दर्शक किंवा कलाकारांचे चित्रपट आवर्जून पाहतो. त्यातल्या त्यात आमिर खान, नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा ह्या कलाकारांचे किंवा आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज अश्या दिग्दर्शकांचे चित्रपट शक्यतो सोडत नाही. तसं चांगला असेल तर राम गोपाल वर्माचा चित्रपट देखील पाहतो, पण आमिर खान, आशुतोष गोवारीकर अश्या लोकांचे चित्रपट शक्यतो पहिल्या दिवशी पाहतो. दुनियेचा review यायच्या आधी मी आपला रिस्क घेऊन मोकळा होतो. आमिर, आशुतोषने अजुन तरी कधी फार निराशा केली नाही. गेल्या ...