खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
आधीची ब्लॉगपोस्ट लिहिता-लिहिता बऱ्यापैकी वाढली आणि मला ती लिहिताना माझी भूक सुद्धा सणकुन वाढली म्हणुन ती मध्येच संपवली. म्हटले बाकीचे पुढच्या भागात लिहूया. पण गेला आठवडाभर 'लडाख ब्लॉग'च्या इतका मागे होतो की ही पोस्ट लिहायची राहून जात होती. म्हटले आज फॉर अ चेंज लिहूया. लिहायला घेतले आणि नेमके संगीताने आधीच्या पोस्टवर कमेंट टाकली. त्यात महेंद्रदादा इंदोरला जाउन तिकडून काय एक-एक भन्नाट पोस्ट टाकत होता. नाव पण काय तर 'चविनं खाणार..इंदौरला' वा.. वा..