'मी मराठीं'नी दिलेला दुवा उघडून पाहिला तर इंग्रजीच आपली राष्ट्रभाषा आहे यावर शिक्कामोर्तब होईल. हिंदी आणि इंग्रजी या दोनांतली एकच भाषा निवडायची असेल तर इंग्रजीच निवडणे उचित, हे कोणालाही पटेल. शालेय शिक्षणामध्ये कमीतकमी पाच भाषा कमीअधिक प्रमाणात शिकवल्या गेल्या पाहिजेत. इंग्रजी, संस्कृतसारखी अभिजात भाषा, एक परकीय भाषा, आपली मातृभाषा नसलेली एखादी भारतीय भाषा आणि प्रादेशिक भाषा.  मातृभाषा ही घरात आईशी बोलायची भाषा आहे, तिचे शालेय शिक्षणात अजिबात स्थान असू नये. जगातल्या कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण दिले जात नाही.

हिंदीची करण्यापेक्षा इंग्रजी शिकायची सक्ती करावी. मराठी न समजणाऱ्याशी आधी इंग्रजीत बोला, आणि ऐकणाऱ्याला समजत नसेल(असे क्वचितच होईल) तर हिंदी वापरून पहा.  सर्वात जास्त इंग्रजी समजणारे लोक ज्या देशात आहेत असा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे.--अद्वैतुल्लाखान