खोकला झाल्यावर येणाऱ्या कफाचे काय करावे हा प्रश्नच आहे. माझ्यापुरता मी हा प्रश्न टिशू (मराठी? ) वापरून सोडवते. टिशूंचे एक बंडल खोकला झाल्यावर कायम खिशात ठेवते; एका टिशूत थुंकून तो कचऱ्याच्या पेटीत टाकायचा. प्रवासादरम्यान कचरापेटी सापडणार नसेल तर एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत सगळे गोळा करायचे असे करते.