सर्वात जास्त इंग्रजी समजणारे लोक ज्या देशात आहेत असा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. --अद्वैतुल्लाखान
अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी. बहुतेक सर्वांना इंग्रजी समजते. भारताची लोकसंख्या सुमारे १०० कोटी. साक्षरतेचे प्रमाण जेमतेम ३० - ३५%, यात जेमतेम सही करण्यापुरती अक्षरओळख, तीही मातृभाषेची, असणारे लोकही आले. किंबहुना असेच लोक जास्त असावेत. त्यामुळे भारतात ३० कोटीपेक्षा जास्त लोकांना इंग्रजी समजते हा दावा अतिरंजित वाटतो.
मध्यंतरी भारतीय वंशाचे २ कोटी शास्त्रज्ञ आहेत असा दावा केलेला वाचला होता. भारताची लोकसंख्या किती, त्यात साक्षर लोकांचे प्रमाण किती, मॅट्रिक पास होणाऱ्यांचे किती, पुढे कॉलेजात जाणाऱ्यांचे किती, त्यातही विज्ञान विषय घेऊन पदवी घेणाऱ्यांचे किती, त्यापुढे जाऊन द्विपदवी घेऊन पुढे विद्यावचस्पती पदवी घेऊन नुसती शिक्षकी न करता खरोखर संशोधन करणारे २ कोटी लोक खरोखर असतील का? मला तसे असे वाटत नाही.
विनायक