इंग्रजी ही इंग्लंडची प्रादेशिक भाषा आहे. तिथल्या तमाम प्रजेची मातृभाषा नाही.तिथे राहणाऱ्या मराठी-चिनी-जपानी मुलाला त्याच्यात्याच्या  मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही. जर्मनीमध्ये सुमारे ६२ भाषा आणि त्यांच्या सुमारे ३० बोलीभाषा बोलल्या जातात. संपूर्ण जर्मनीत फ्रेन्‍च आणि इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या एकूण फ़क्त दोन (आंतरराष्ट्रीय) शाळा आहेत. उरलेल्या सर्व शाळा केवळ जर्मनमधूनच शिकवतात.  कुठे आहे मातृभाषेतून शिक्षण? मातृभाषेतून शिक्षण मिळाले कीच मुलांना विषय समजतो ही केवळ कविकल्पना आहे. आज गुजराथ, मध्य प्रदेशातली हजारो मराठी मुले तिथल्यातिथल्या प्रादेशिक भाषेत आणि इंग्रजीतून शिकतात, त्यांना मातृभाषेतून न मिळालेल्या शिक्षणपरत्वे त्यांचे अध्ययन हिणकस असते असे मला मुळीच वाटत नाही.--अद्वैतुल्लाखान