अमेरिकेची लोकसंख्या १९९५ मध्ये २६ कोटी होती अशी माहिती मिळाली, म्हणजे २००९ मध्ये ती खरोखरच ३० कोटीवर पोचली असेलही. तसे असल्यास, मी वरती उद्धृत केलेला दावा अतिरंजित ठरतो यात काहीच शंका नाही. ते विधान मी ज्या विद्वान वक्त्याकडून ऐकले होते त्याने बहुधा अमेरिकेला विचारात घेतले नसावे, किंवा कुठल्याही आधारभूत आकडेवारीचा वापर केला नसावा.
इतके असूनही, 'व्हेन इन डिफिकल्टी, स्पीक इंग्लिश' ह्या धोरणाने भारतभर प्रवास करता येतो, हा स्वानुभव आहे. हिंदीचा असा उपयोग होतोच असे नाही. ---अद्वैतुल्लाखान