राहुल,
इतर अनेक राजे आणि शिवाजी महाराज यांच्यात मला एक फरक जाणवतो. शिवाजी महाराजांमध्ये प्रसंगी माघार घेण्याची धमक होती (जी राज्य टिकण्यासाठी आवश्यक होती). देशासाठी जीव देणं हे श्रेष्ठच (जे संभाजी, झाशीची राणी यांनीही केलं) पण जीव वाचवून (पळ काढून) नंतर दुश्मनाला नाकी नऊ आणणं हेही. शिवाजी महाराजांनी हे अनेक वेळा केलं. सिद्दी जोहर, आग्र्याहून सुटका ही उदाहरण. याचा अर्थ ते पळपुटे होते असा मुळीच नाही; उलट एखाद्या प्रसंगी, दूरचा विचार करून, माघार घेणं उत्तम हे शहाणपण त्यांच्यात होतं.
शिवाजी महाराजांनी अनेक वैज्ञानिक कार्यक्रम राबवले. उदा. पुरंदरला तोफांचा कारखाना काढला. त्यांनी एक छापखानाही विकत घेतला होता. राणा प्रतापावद्दल मला माहिती नाही.
शिवाजीमहाराज आणि राणा प्रताप यांचं श्रेष्ठत्व वादातीत आहे; पण
भारतात इतिहासात मला तरी फक्त ह्या दोनच व्यक्ती श्रेष्ठ वाटतात
हे विधान मला जरा अतिशयोक्तीचं वाटलं. पहिला बाजीराव हा पटकन आठवला. शनिवार वाड्यासमोरच्या बाजीरावाच्या पुतळ्याखाली एका ब्रिटिश इतिहासकाराचं वाक्य आहे - बाजीरावानं पादाक्रांत केलेला भूभाग हा नेपोलियनच्या तुलनेतही जास्त होता; नेपोलियन पराभूत झाला; पण बाजीराव कधीच नाही.
- कुमार