केदार,
मला असं वाटतं की नट जर स्वतः गायक असला, तर अनेक आवाज त्याला शोभून दिसतात. याचं कारण मुळातच त्या नटात गाण्याबरहुकूम ओठांची हालचाल करण्याचं, (गाण्याची तरलता / अवघडपणा / त्यातल्या जागा दाखवणं इ. बाबतींचं) कसब चांगलं असतं. अमिताभ हा स्वतः ताला-सुराचं ज्ञान असलेला चांगला गायक आहे, त्यामुळे अनेक आवाजांना त्यानं चांगला न्याय दिला आहे. वास्तविक रफीचा आवाज वेगळा आहे; पण अमिताभच्या तोंडी त्याची गाणी बघताना चांगली वाटतात. याचं हेच कारण असावं.
राज कपूर हाही एक उत्तम संगीतज्ञ होता आणि त्यामुळे मुकेश आणि मन्ना डे हे भिन्न शैलीचे गायक त्याच्या तोंडी पडद्यावर ऐकताना छान वाटतात.
- कुमार