माधवराव,
आपला उपक्रम स्तुत्यच आहे. माझ्यासारख्या काही मनोगतींना अगदीच माहीती नसण्यापेक्षा जुजबी माहीती चालते व ह्या माहीतीवरून मी शास्त्र पंडीत बनणार नाही ह्याचीही मला कल्पना आहे. बाकी आपल्या ह्या व अशा लेखांना मिळणारे प्रतिसाद मात्र मजेदारच असतात. येथील बऱ्याच लोकांना श्लोक वा शास्त्राची तुमच्यापेक्षा जास्त जाण असल्याचे आलेल्या त्यांच्या प्रतिसादांवरून दिसून येते पण त्यावर प्रकाश पाडावा किंवा आपणा जवळील माहीती इतरांना द्यावी अशी ईच्छा त्या लोकांची नसते हे कळणाऱ्याला कळतेच. लेखनात लिहीणाऱ्याला त्याच्या उणीवा दाखवून व हिणकस प्रतिक्रिया देवून स्वतःचा बडेजाव दाखवणारे व मेणबत्यांशी न खेळण्याचा सल्ला अप्रत्यक्षरित्या देणारे येथेही आहेत हे पाहून आनंदच (?)होतो.स्वतःच्या बोटांची खाज घालवायला असल्या प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या तोडीचं लिखाण असल्या व्यक्तीं कडून होणार नाही कारण त्या सगळ्या फालतू गोष्टीं साठी वेळ नसतो ना !
हे बोलण्याची पाळी माझ्या सारख्या कनिष्ठ व वयाने / अनुभवाने लहान असलेल्या विद्यार्थी दशेतल्या 'मनोगती' वर यावी हेच दुर्दैव. थोड्याच दिवसांत सुट्टी संपून परत कॉलेज ला सुरूवात होईल व मनोगत वर यायला मिळेल ते मोका मिळाल्यावरच ! मात्र काही लेखांनी येथे बरेचसे शिकायला मिळाले ह्यातच आनंद आहे.
आपण करीत असलेल्या प्रयत्नां बद्द्ल परत एकदा अभिनंदन -
मालकंस.