आरती हा 'आर्तिक्य' वरून आलेला शब्द. असे का म्हटले असावे? आणि आर्तिक्य म्हणजे काय?  आर्तिकता? म्हणजे? या शब्दाचा ओवाळून टाकण्याशी काय संबंध असेल?

संस्कृतमध्ये ऋ हा तिसऱ्या गणाचा धातू आहे. याचे इयर्ति‌ असे रूप होते. शिवाय, आर्त(दु:खी), आरतिः(आरती), आरात्रिकम्‌(आरती), आर्ति:(दु:ख)‌  हे इतके शब्द आहेत.   आरती यांपैकी कुणापासूनही व्युत्पन्‍न झाला असावा.