जपाची माळ सुद्धा प्रत्येकाने वेगवेगळी ठेवण्याचा प्रघात आहे.

इतकेच कश्याला आपल्या शास्त्राप्रमाणे आसन सुद्धा सिध्द करुन घ्यावे लागते.
मला एका आधिकारी सत्पुरुषाने असे सांगीतले होते, ( आसनजय)
१. एक ठरलेली वेळ आणि किती वेळ बसणार आहोत हे ठरवुन घ्यावे.
२. प्रत्येक दिवशी त्याच वेळी त्याच आसनावर बसावे.
३. मन शांत करावे आणि काहीही विचार न करता शांत बसावे.
४. सुरवातीला मनात जे काही विचार येतील ते येवु द्यावे आणि त्यात आपली " ढवळाढवळ" करु नये. फक्त त्या विचारांना पाहत राहावे.
५. काही काळातंराने मनाचा 'कचरा' साफ होत जातो आणि मनातील "निर्मळतेचे" दर्शन होत जाते.

यासाठी कमीतकमी ६ महीने ते ३ वर्ष थांबण्याची तयारी हवी.

बाकी बरीच माहिती चा अंतर्भाव राहीलेला आहे. कोणी केला तर बरेच होईल.

द्वारकानाथ