माधव,
वैज्ञानिक दृष्टया विचार केल्यास पुजेला रेशिम किंवा लोकरीचे कपडे अधिक लाभदायक ठरतात कारण धार्मिक कार्यांच्या वेळी मंत्रोच्चारातून उठणारी ध्वनीस्पंदने व विद्द्युत- लहीरी शीघ्रपणे अंगभर फिरण्यासाठी अंगास घर्षण होणारे रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र अधिक लाभदायक ठरते.
ह्यासाठी आपणाकडे काही वैज्ञानिक आधार आहे का? असल्यास त्याचा संदर्भ कृपया देत जा.
तुमचे सगळे विचार धार्मिक आणि श्रद्धा यानावाखाली मांडत जा. ज्यांना पटतील ते वाचतील बाकीचे सोडून देतील.कोणत्याही आधाराशिवाय 'वैज्ञानिक दृष्टया' वगैरे शब्द वापरू नका.
मी स्वतः सर्व प्रकारची वस्त्रे घालून मंत्रोच्चार ऐकला आहे मला कधीही ध्वनीस्पंदने व विद्युत लहीरी शीघ्रपणे अंगभर फिरतं असल्याचे आठवत नाही आणी त्यासाठी अंगास घर्षण होणारे रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र (बाकीची वस्त्रे ही अंगास घर्षण रहीत असतात हे आजच समजत आहे)अधिक लाभदायक ठरते असे अजिबात वाटले नाही. कोणास अनुभव असल्यास जरूर मांडावा.
मल्लू यास,
आपला अभिप्राय नक्की काय सांगतो आहे तेच समजले नाही. आपला अभिप्राय वगळता ह्या धाग्यामध्ये 'हिणकस' असे काही दिसून आले नाही. बहुदा प्रशासकांनी ते लिखाण रद्द केले असावे.