शुद्ध मराठी, आपण म्हटल्याप्रमाणे 'आरती' हा शब्द अनेक शब्दांवरून व्युत्पन्न झाला असू शकतो.
पण पूजाविधीमध्ये, 'आर्तिक्यनीराजनदीपं दर्शयामि' किंवा 'कर्पूरार्तिक्यदीपं दर्शयामि' अशी वाक्ये येतात आणि नंतर 'अथार्तिक्यं' असेही म्हणतात, म्हणून मी 'आर्तिक्य' वरून 'आरती' हा शब्द आला असे म्हटले.
या शब्दाचा ओवाळण्याशी संबंध आहे असे मी म्हटलेले नाही. मी फक्त एवढेच म्हटले आहे, की आर्तिक्य ह्या शब्दाचा संबंध भावनिकतेशी निगडीत आहे. (माझे मत)
'आरती ओवाळणे' ह्या बद्दल बोलताना मी 'ओवाळणे' च्या वेगळ्या अर्थच्छटेबद्दल बोललो आहे. तिथे अजून स्पष्ट लिहायला हवे होते, पण कंटाळा केला, 'ओवाळून टाकणे' ऐवजी 'जीव ओवाळून टाकणे'. ह्यामध्ये देवावर जीव ओवाळून टाकणे असे काहीसे मला अभिप्रेत होते. (अर्थात हे माझे मत आहे, तसेच असेल असे नाही)
ह्यावरूनच मनात आलं की आपण जे 'औक्षण' करतो, त्यातही 'ओवाळणे' असतेच. (ओवाळणे म्हणजे फक्त दीप दाखवणे असे असावे का? ) कारण देवालाही 'दीपं दर्शयामि' (शब्दशः दिवा दाखवतो) असेच आपण म्हणतो. मग ह्यामागे नक्की कोणतं प्रतीक दडलेलं असावं? केवळ तेजाची पूजा? की अजून काही?