स्वातत्र्यलढ्यात दाक्षिणात्यांचा सहभाग नगण्य होता. त्यांनी इंग्रज सरकारची चाकरी करण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्यांचा भारतांतील इतर भाषांशी व भाषकांशी फारसा संपर्क आला नाही. इतर प्रांतांतील लोक मोठ्या संख्येने जेलमध्ये तरी एकत्र भेटत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका आठवणीप्रमाणे अंदमानात कैदेत असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये एकही कानडी माणूस नव्हता. स्वातंत्र्यानंतरही बराच काळ आपल्या राज्यकर्त्यांनी इंग्रजी चालूच ठेवले. त्यामुळे मिळणारा फायदा चालू राहावा म्हणूनही दाक्षिणात्यांनी हिंदीला विरोध चालू ठेवला असावा. शिवाय हिंदी हद्दपार केल्यास उत्तर भारतीयांचे लोंढेही थांबतील व स्थानिकांच्या हक्कावर गदा येणार नाही हेही दाक्षिणात्यांनी अगोदरच ओळखले असावे.