घडा हा शब्द केवळ नमनाला घडाभर तेल एवढ्यापुरताच वापरला जातो असे नव्हे तर घडा हा शब्द तसा प्रचलित आहे. पालथ्या घड्यावर पाणी, पापाचा घडा इ. म्हणजे त्याचे संदर्भ इतरही विस्तृत प्रमाणात दिसतात.
हे तर १००% बरोबर आहे. म्हणूनच धड्याऐवजी घडा लोकांना ओळखीचा वाटला आणि तेच चालू राहिले असे मला वाटते.
मला असे म्हणायचे होते/आहे की मुळात तेलाच्या संदर्भात 'घडाभर' हा शब्दप्रयोग होण्याची शक्यता कमी आहे.
मी माझ्या परीने ह्या धडा-घडा प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करीत आहेच. बघू केव्हा यश मिळतंय.